कृपाशंकर सिंह यांच्या मुलाची एसआयटीकडून चौकशी

October 22, 2012 3:35 PM0 commentsViews: 3

22 ऑक्टोबर

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी एसआयटीनं कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्रमोहन सिंह याचीही चौकशी केली. रविवारी मुंबई पोलीस हेडक्वार्टरमध्ये कित्येक तास ही चौकशी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कृपाशंकर यांचीही एसआयटीनं दोन वेळा चौकशी केली आहे. नरेंद्र मोहन यांचे आर्थिक व्यवहार कृपाशंकर यांच्यापेक्षासुद्धा जास्त आहेत. ही चौकशी 8 आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने गेल्या सप्टेंबरमध्ये एसआयटीला दिले होते. या एसआयटीचं नेतृत्व मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्याकडे आहे.

close