दिग्विजय सिंग यांचे केजरीवालांवर टीकास्त्र; 27 प्रश्नांचे मागितले उत्तर !

October 20, 2012 12:13 PM0 commentsViews: 8

20 ऑक्टोबर

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर तोफ डागलीय. केजरीवाल हे अहंकारी असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी केजरीवाल यांना 27 प्रश्नं विचारली आहेत. केजरीवाल यांचा सर्व्हिस रेकॉर्ड आणि त्यांच्या एनजीओ (NGO) च्या निधीबद्दलची ही प्रश्नं आहेत. 20 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये केजरीवाल यांची तसंच त्यांच्या पत्नीचीही दिल्लीबाहेर बदली का झाली नाही याचं उत्तर दिग्विजय यांनी मागितलंय. केजरीवाल यांचे अमेरिकेतल्या आवाज या 'एनजीओ'शी काय संबंध आहेत असा प्रश्नही दिग्विजय यांनी विचारला आहे.

दिग्विजय सिंग यांचे केजरीवालना प्रश्न- 20 वर्षांच्या सर्व्हिसमध्ये तुमची दिल्लीबाहेर बदली झाली नाही, हे खरं आहे का ?- महसूल विभागात असलेल्या तुमच्या पत्नीचीही दिल्लीबाहेर कधीच बदली झाली नाही ?- 'एनजीओ'ची स्थापना करण्यासाठी तुम्ही सरकारची परवानगी घेतली?- तुमचा संबंध असलेल्या 'एनजीओ'कबीरला फोर्ड फाऊंडशनकडून निधी मिळाला हे खरं आहे का?- अमेरिकेतल्या आवाज या 'एनजीओ' शी तुमचा संबंध काय?

close