नितीन गडकरींना संघाचं अभय

October 24, 2012 10:11 AM0 commentsViews: 3

24 ऑक्टोबर

वेगवेगळ्या आरोपांनी घेरलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना सध्या तरी संघाचं अभय मिळालंय. गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये बेनामी पैसा गुंतवल्याचे आरोप झाल्यानंतर गडकरींनी अध्यक्षपदाची दुसरी टर्म धोक्यात आल्याची चर्चा होती. पण आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गडकरींना दुसर्‍यांदा अध्यक्ष करण्याचा निर्णय रद्द न करण्याचा संघानं ठरवलंय. एक-दोन कंपन्यांचे पत्ते चुकले तर त्यासाठी गडकरींना जबाबदार धरणं योग्य होणार नाही, अशी माहिती संघातील काही सूत्रांनी दिली आहे. तसंच या महिनाअखेर चेन्नईमध्ये संघाची प्रतिनिधी सभा होतेय. या बैठकीत गडकरींना परत मिळणार्‍या टर्मबद्दल परिवारातील इतर संघटनांच्या प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. गडकरींना सध्या अभय मिळालं असलं तरी संघातील एका गटाला गडकरींनी राजीनामा द्यावाअसं वाटत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

close