आता पुण्यातही गगनचुंबी इमारती

October 22, 2012 4:42 PM0 commentsViews: 58

22 ऑक्टोबर

मुंबईप्रमाणेच काही दिवसांमध्ये पुण्यातही आता उंच इमारती पहायला मिळणार आहे. कारण शहर सुधारणा समितीने मान्यता दिलेल्या जुन्या विकास आराखड्यामध्ये उंच इमारतींना परवानगी देण्याची तरतुद सुचवण्यात आली आहे. पुण्यामध्ये आत्तापर्यंत 100 मीटर म्हणजे जवळपास 27 मजल्यांपर्यंत उंच इमारत बांधायला परवानगी होती. आता शहरात 64 मजल्यांपर्यंत इमारती उभारल्या जाऊ शकतील. यामध्ये बदल करत 150 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी असा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. पण शहर सुधारणा समितीने मुंबईच्या धर्तीवर 180 ते 200 मीटर उंच इमारती बांधायला परवानगी द्यावी अशी उपसुचना मांडली होती. शहर सुधारणा समितीने या विकास आराखड्याला मंजुरी दिली असून आता 25 तारखेला मुख्य सभेमध्ये हा आराखडा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

close