मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकर्‍यांचा गोंधळ

October 20, 2012 2:57 PM0 commentsViews: 10

20 ऑक्टोबर

इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेत आज गोंधळ झाला. नीरा-भीमा आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे इंदापूर दौर्‍यावर होते. निरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचं भाषण सुरू असताना ऊस दरावरून शेतकर्‍यांनी गोंधळ केला. तीच परिस्थिती कर्मयोगी साखर कारखान्यावर आली. दिवाळीचा हप्ता अवघा 200 रूपयांवर जाहीर केल्यामुळे शेतकर्‍यांनी घोषणाबाजी केली आणि सभागृहातून बाहेर पडले. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यातल्या शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

close