गडकरींच्या बचावासाठी अडवाणींही उतरले मैदानात

October 24, 2012 11:00 AM0 commentsViews: 1

24 ऑक्टोबर

एकीकडे संघाने नितीन गडकरींना अभय दिलं असताना आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींही गडकरींच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. आपल्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली गेली पाहिजे असं गडकरींनीच स्पष्ट केल्यानं भाजप आणि काँग्रेसमधला फरक स्पष्ट झाला आहे असं सांगत अडवाणींनी गडकरींना पाठिंबा दिलाय. गडकरींवरील आरोप हे व्यवसायातील तत्वांसंदर्भात झालेले आहेत, पण पदाचा वापर करुन भ्रष्टाचार केल्याचे नाहीत असंही अडवाणींनी स्पष्ट केलंय.

अडवाणी गडकरींच्या पाठीशी यूपीए सरकारवरील गंभीर आरोपांपासून लक्ष हटवण्यासाठी गडकरींवर आरोप केले जाताहेत. शेतकर्‍यांच्या जमिनींबाबतचे गडकरींवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत हे त्यांनी स्वत:च पटवून दिलंय. काही माध्यमांनी त्यांच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय. त्याचबरोबर नि:पक्ष चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलंय. गडकरींच्या या भूमिकेतून भाजपचं वेगळेपण अधोरेखित होतं. गडकरींवरील आरोप हे व्यवसायातील तत्त्वांसंदर्भात झालेले आहेत, पण पदाचा वापर करून भ्रष्टाचार केल्याचे नाहीत. त्यामुळे मला विश्‍वास आहे की सरकार या सगळ्या प्रकरणाची नि:पक्षपणे चौकशी करेल आणि यात कसलंही राजकीय शत्रुत्व आणणार नाही. गडकरींनी स्वत:च चौकशी करण्याची मागणी केलीय त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो.