गुलबर्गामध्ये नऊ जणांना जलसमाधी

October 20, 2012 2:17 PM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर

कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात बोटिंग करणार्‍या नऊ जणांना जलसमाधी मिळालीय. जिल्ह्यातल्या ख्वाजा कोटणूर तलावात ही दुर्घटना घडली. गुलबर्गा शहरातील मोमीनपुरा भागातील नागरिक सहलीसाठी या तलावाकडे गेले होते. 13 पर्यटक बसलेल्या या बोटीला तलावाच्या मध्यावर गेल्यावर अचानक क्रॅक गेला. त्यामुळं घाबरलेले पर्यटक बोटीच्या एका बाजूला जमा झाले त्यामुळे बोट उलटली आणि नऊ जणांचा दुर्देवी अंत झाला.

close