ब्रिटनच्या उच्चायुक्तांनी घेतली मोदींची भेट

October 22, 2012 4:56 PM0 commentsViews: 3

22 ऑक्टोबर

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी उतरलेले असतांना त्यांना एक सुखद धक्का बसला. ब्रिटनचे भारतातले उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि व्यापार सहकार्यच्या दृष्टीनं चर्चा केली. 2002 च्या दंगलीत 3 ब्रिटीश नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ब्रिटननं मोदींबरोबरचे व्यापारी संबंध थांबवले होते. पण गुजरातच्या विकासाचा वेग बघता व्यापारी संबंध पूर्ववत करण्याची ब्रिटनची इच्छा आहे. विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात सहकार्य करण्यावर ब्रिटनचा भर आहे.

close