‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’

October 24, 2012 11:36 AM0 commentsViews: 134

24 ऑक्टोबरदसरा आनंद आणि मांगल्याचा सण….वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणजे विजयादशमी, म्हणजेच दसरा…महाराष्ट्रासह देशभरात आज दसरा साजरा केला जातोय. अश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या आजच्या दिवशी सोनं खरेदी अतिशय शुभ मानली जाते. शिवाय, गाड्या, यंत्र किंवा वस्तुंची खरेदीही शुभ मानली जाते. आज वह्या, ग्रंथ, शस्त्रं, अवजारं, उपकरणं याची पूजा केली जाते. आपट्याची पानंही आज सोनं म्हणून दिलं जातं. दसर्‍याच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. आजच्याच दिवशी रामानं रावणाचं वध केल्याचं सांगितलं जातं. तर आजचं पांडवांचा अज्ञातवास संपला होता, अशीही आख्यायिका आहे. आजच्याच दिवशी दुर्गा मातेनं चंडीचं अवतार घेऊन महिषासुराचा वध केला, असंही सांगितलं जातं.

देशभर दसरा उत्साहात साजरा केला जातोय. वेगवेगळ्या राज्यांमध्ये दसरा वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. म्हैसूरमध्ये दसर्‍याला निघणारी शाही मिरवणूक हे खास आकर्षण…आजही ही मिरवणूक निघाली. ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी इथं परदेशी पर्यटकांचीही दरवर्षी उपस्थितीत असते. तर प.बंगालमध्ये दसरा खास पद्धतीनं साजरा केला जातो. इथं नऊ दिवस चालणार्‍या नवरात्रोत्सवाची सांगता आज होतेय, त्यानिमित्तानं इथं वेगळ्या पद्धतीनं दसरा साजरा केला जातो. इथं सिंदूर खेला ही प्रथा पाळली जाते. तर दुसरीकडे दसर्‍याच्या निमित्ताने सगळीकडे रावणाचं दहन होत असताना कानपूरमध्ये मात्र आज रावणाची विधीवत पूजा केली जाते. आज कानपूरमधल्या दशानन मंदिरात रावणाला सकाळी स्नान घालून नैवैद्य दाखवून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जातं. फक्त दसर्‍याच्या एकाच दिवशी या मंदिरात लोकांना प्रवेश दिला जातो.आज संध्याकाळी हे मंदिर पुन्हा वर्षभरासाठी बंद ठेवण्यात येईल.

close