पोलीस स्टेशनमध्येच महिला एपीआयवर हल्ला

October 22, 2012 9:05 AM0 commentsViews: 14

22 ऑक्टोबर

पोलीस स्टेशनमध्येच एका महिला एपीआयवर आरोपीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना विरार इथं घडली. विरारमधील फुलपाडा भागात राहणारे गिरीश यादव यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विरार स्टेशनमध्ये दाखल केली होती त्यांच्या सांगण्यावरुन मुलीसह अमित झा आणि त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस सहाय्यक प्रितम मुठे यांनी संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांनी मुलगी यादव यांच्या ताब्यात देण्याचे सांगितलं.मात्र झा याने मुलगी ताब्यात देण्यास नकार दिला.यावेळी बाचाबाची होऊन पर्यायाने रुपांतर हाणामारीत झाले. संशयितांनी एपीआय प्रितम मुठे यांनाच जबर मारहाण केली. एका संशयितानं प्रितम मुठे यांना मोबाईल फेकून मारला. त्यात त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. मुठे यांच्यावर विरारमधील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यावेळी स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस काँन्स्टेबल जाधव यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

close