नितीन गडकरी – म्हैसकरांचे संबंध पुन्हा उघड

October 25, 2012 10:12 AM0 commentsViews: 7

25 ऑक्टोबर

नितीन गडकरी आणि आयआरबीचे म्हैसकर यांच्या अर्थपूर्ण मैत्रीची चर्चा सुरू असताना..गडकरींच्यापूर्ती साखर कारखान्यानं म्हैसकर यांच्या आयडीएल एनर्जीला प्रकल्पाला कशाप्रकारे मदत केली हे आता उघड झालंय. सहकारी संस्था म्हणून पूर्तीनं शेतकर्‍यांकडून घेतलेल्या जमिनीचा काही हिस्सा आयडीएल एनर्जीला प्रकल्पासाठी विकला. एवढंच नाहीतर तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार आणि ऊर्जामंत्री दिलीप वळसे पाटील यांनीसुद्धा गडकरींसाठी नियम धाब्यावर बसवले असल्याचं उघड झालंय. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन गडकरींच्या पूर्तीला वेळोवेळी खास मदत झाली.

आयडियल-पूर्तीचा घोळ

540 मेगावॅटचा आयडियल एनर्जी प्रकल्प2006 मध्ये पूर्तीकडून 55 एकर जागा घेतलीशेतकर्‍यांकडून घेतलेल्या 180 एकर जागेतून विक्रीशेतकर्‍यांना 54 लाख रु.दिलेआयडियला 3 कोटी 40 लाखांना विक्री

वेणा वडगाव धरणआयडियल एनर्जी प्रकल्पाला 17.8 द.ल.घ.मी. पाणीपूर्तीला 1.31 द.ल.घ.मी. पाणी10 टक्के पाणी औष्णिक वीज प्रकल्पासाठी वापरणारहरीत इंधनावर आधारीत सहवीज प्रकल्पराज्य सरकारकडून 50 टक्के सवलतखासगी प्रकल्पाला 50 टक्केच खर्च

close