औरंगाबामध्ये युतीच्या नगरसेवकांची टूर निघाली

October 25, 2012 10:18 AM0 commentsViews: 1

25 ऑक्टोबर

औरंगाबाद महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या वतीनं महापौरपदासाठी श्रीमती कला ओझा यांचा अर्ज दाखल केला. तर भाजपाच्या वतीनं उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या 30 नगरसेवकांचा जथ्था टूरवर निघाला आहे. युतीमधला कोणता उमेदवार फुटू नये यासाठी युतीकडून प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी 51 नगरसेवकांचा आकडा युतीकडे आहे तर आघाडीकडे 48 नगरसेवक आहेत, त्यामुळं युतीमधला कोणताही नगरसेवक फुटू नये आणि कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

close