9 सिलिंडरची घोषणा आठवड्याभरात -मुख्यमंत्री

October 23, 2012 11:14 AM0 commentsViews: 1

23 ऑक्टोबर

महागाईच्या खाईत होरपळणार्‍या जनतेला राज्य सरकारने दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या सवलतीबाबत येत्या आठवड्यात निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांंगितलंय. काँग्रेसशासीत राज्यात गॅस सिलिंडरची सवलत 6 वरून 9 करावी अशा सुचना काँग्रेस हायकमांडनं दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातही सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या 9 होणार अशी चर्चा होती. पण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थखात्यानं या निर्णयाला अडकाठी घातल्यानं हा निर्णय लांबणीवर पडला आहे. दरम्यान, काल अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आपल्याकडे याबाबतचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आठवडाभरात याबाबत निर्णय होईल अशी घोषणा केली आहे.

close