अखेर जायकवाडी धरणात पाणी पोहचले

October 25, 2012 10:25 AM0 commentsViews: 3

25 ऑक्टोबर

भंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडी धरणात पोहचले. रविवारी सकाळी भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी पाचव्या दिवशी जायकवाडीत आलं. 210 किलोमीटरचं अंतर पार करताना कोरडं पडलेलं नदीपात्र आणि बेसुमार वाळू उपसा यामुळं पाणी पोहोचण्यास उशीर झाला. आता जायकवाडी धरणात धीम्या गतीनं पाणी येतंय.आता अडीच टीएमसी सोडलेल्या पाण्यातून जायकवाडी धरणात किती पाणी पोहोचेल हे आणखी दोन दिवसानंतरच कळेल. सध्या जायकवाडीत अडीच टीएमसी पाणी आहे. भंडारदरा धरणातून सोडलेलं अडीच टीएमसी पाणी पहाटे जायकवाडीत पोहोचलं. जायकवाडीत साधारण दीड टीएमसी पाणी मिळेल. हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येईल आणि हे पाणी जूनपर्यंत पुरेल अशी शक्यता आहे.

close