दक्ष मुंबईकरांनी पकडून दिला ‘बच्चा चोर’

October 26, 2012 1:30 PM0 commentsViews: 4

26 ऑक्टोबर

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधील एका दिवसाचं बाळ चोरण्याची घटना ताजी असताना भाईंदरमध्येही मुलं पळवण्याची घटना पुढं आली आहे. गर्दीचा फायदा घेऊन दोन तरूण एक चोरलेलं दीड वर्षाचं बाळ घेऊन चर्चगेट-विरार लोकल ट्रेनमध्ये चढले. लहान मुलगा जवळ असल्याचं पाहून एका नागरिकांने त्यांना बसायला जागा दिली. पण त्यांची हालचाल संशयास्पद होती. अगोदर ते नायगावजवळ उतरण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना रोखलं पुढे ते वसईजवळ पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला. लोकांचा संशय आणखी बळावला आणि त्यांना पकडून ठेवले पुढे नालासोपार्‍यात उतरवून त्यांना पोलिसांच्या स्वाधानी केलं. पोलिसांनी चौकशी केली असता त्या दोन्ही तरुणांनी हे दीड वर्षाचं बाळ भाईंदरमधून चोरलं असलाचं स्पष्ट झालं. पण पोलिसांच्या हलगर्जीपणाचा कळस म्हणजे यातला एक जण पळून गेला. त्यामुळं नागरिकांचा संतापाचा पारा चांगलाच चढला. एका गुन्हेगाराला नीट पकडता येतं नाही का ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. पण दक्ष मुंबईकरांमुळे दीड वर्षाचा चिमुकला सुखरुप आहे.

close