धुळ्यात डेंग्यूचे थैमान, रुग्णांची संख्या 200च्यावर

October 23, 2012 11:20 AM0 commentsViews: 4

23 ऑक्टोबर

धुळे शहरातही गेल्या महिनाभरात डेंग्युच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. शासकीय आकडेवारीनुसार मात्र, गेल्या 20 दिवसात फक्त 10 रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचं सांगितलं जातं. मात्र, खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्युचे रुग्ण मोठ्या संख्यानं उपचार घेत आहेत. त्यांची नोंद सरकारकडे होत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण होऊनही शहरातली घाणीची बजबजपुरी कायमच आहे. महिनाभरापूर्वी धुळ्यातल्या नेर गावात मंगला पारख या महिलेचा डेंग्युनं मृत्यू झाला होता.

close