जितेंद्र आव्हाडांविरोधात धमकावण्याची तक्रार दाखल

October 25, 2012 10:55 AM0 commentsViews: 4

25 ऑक्टोबर

नवी मुंबई महापालिकेतले इंजिनिअर अवधूत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धमकावल्याची तक्रार सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. नेरुळमधल्या पाम टॉवर या वादग्रस्त बिल्डिंगमधल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करता यावी म्हणून अवधूत मोरे माहिती गोळा करत होते. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना शांत बस नाहीतर आयुष्यातून उठवेन अशी धमकी दिल्याचा मोरे यांचा आरोप आहे. तर आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले आहे.

close