सन टीव्हीनं विकत घेतली हैदराबाद टीम

October 25, 2012 11:00 AM0 commentsViews: 6

25 ऑक्टोबर

आयपीएलमधून डेक्कन चार्जर्सचा पत्ता कट झाल्यानंतर आता हैदराबादची टीम सन टीव्हीनं विकत घेतली आहे. डेक्कन क्रॉनिकलकडून टीमची मालकी काढून घेतल्यानंतर या टीमचं काय होणार याबद्दल साशंकता होती. पण अखेर या टीमला नवीन मालक मिळाला आहे. सन टीव्हीनं प्रत्येक वर्षाला 85 कोटी रुपये या करारावर हैदराबादची टीम विकत घेतली आहे. या टीमबरोबर सन टीव्हीचं दहा वर्षांचा करार आहे. द्रमूकचे मारन बंधू हे सन टीव्हीचे मालक आहेत. तर आता या टीमचं नाव काय असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

close