नितीन गडकरींना राजीनामा द्यावा – जेठमलानी

October 23, 2012 11:54 AM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर

एकीकडे काँग्रेसनं नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली असताना भाजपचे खासदार राम जेठमलानी यांनी पुन्हा एकदा पक्षालाच घरचा अहेर दिला आहे. नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राम जेठमलानी यांनी केली आहे. गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांना दुसर्‍यांदा अध्यक्षपदही देऊ नये असं जेठमलानी यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे या अगोदरही जेठमलानी यांनी गडकरींवर निशाना साधला होता. अरविंद केजरीवाल नितीन गडकरींबद्दल काही तरी गौप्यस्फोट करणार अशी चर्चा सुरु असताना जेठमलानी यांनी केजरीवालांना पाठिंबा जाहीर करत आपणही गडकरींच्याविरोधात पुरावे देऊ असंही जेठमलानी यांनी स्पष्ट केलं होतं. एकंदरीतच एकीकडे भाजपचे श्रेष्ठी गडकरींची पाठराखण करत आहे तर दुसरीकडे जेठमलानी घरचा अहेर देत आहे.

close