टोलविरोधात मनसे आता कोर्टात लढणार

October 26, 2012 5:35 PM0 commentsViews: 42

26 ऑक्टोबर

टोलच्या प्रश्नावर आंदोलन केल्यानंतर आता मनसे हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. टोलचा कारभार पारदर्शक व्हावा अशी मागणीही मनसेनं केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मनसेनं यासंदर्भात टोल विरोधात आंदोलन केलं होतं. याच मुद्यावरुन राज ठाकरेंनी कालच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही भेट घेतली होती. 'टोल भरू नका' असा आवाहन मनसेचे अधक्ष्या राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेसैनिकांनी एकच टोल नाक्यांवर हल्लाबोल केला होती आणि टोल नाके बंद पाडले होते. टोल नाक्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट होतेय, टोल नाक्यांची मुदत संपून सुद्धा लोकांकडून टोल घेतले जातात असा आरोप राज यांनी केला होता. राज यांच्या या आंदोलनामुळे जनतेनंही मोठ्या दिलाने स्वागत केलं होतं. मनसेचे कार्यकर्ते प्रत्येक टोलनाक्यावर जातीने लक्ष देऊन माहिती गोळा करत होते पण आंदोलन संपले आणि सगळे काही जैसे थे झाले. अखेर गुद्यावरून मनसे आता मुद्यावर कोर्टात लढणार आहे.

close