वाडिया हॉस्पिटलमधून पळवलं एक दिवसाचं बाळ

October 25, 2012 11:14 AM0 commentsViews: 19

25 ऑक्टोबर

मुंबईतल्या परळमधील वाडिया हॉस्पीटलमधून काल संध्याकाळी एक दिवसाचे बाळ पळवण्याची घटना घडली आहे. 10 क्रमाकांच्या जनरल वॉर्डमध्ये बोरिवलीतील जस्मिन नाईक या 28 वर्षीय महिलेने मंगळवारी रात्री आठ वाजता मुलाला जन्म दिला. बुधवारी सायंकाळी जस्मिन त्यांच्या आईसोबत वॉर्डमध्ये चालत असतांना गर्दीतून आलेल्या एका महिलेने बाळ पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला. भगव्या रंगाच्या साडीतील एका महिलेने हे बाळ चोरल्याचा संशय आहे.

आता या बाळाच्या शोधासाठी पोलिसांची पथकं नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि शिर्डीमध्ये गेली आहेत. पोलिसांनी एका महिलेचे स्केच जारी केले आहे. दरम्यान, वाडिया हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही यंत्रणाच नसल्याचं उघड झालंय. पोलिसांनी हॉस्पिटलबाहेर दुकानांच्या सीसीटीव्हीमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यातूनही काही माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर वाडिया हॉस्पिटलच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला गेल्याचं आता उघड होतंय. वरीष्ठ सुरक्षा अधिकार्‍याचं पद इथं एक महिन्यापासून रिक्त आहे. तसेच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्टपिटलमध्ये मनुष्यबळाची कमतरताही आहे.

close