विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं अपघाती निधन

October 25, 2012 11:22 AM0 commentsViews: 10

25 ऑक्टोबर

प्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांचं आज निधन झालं. 'पॉवर कट'या सिनेमाच्या प्रमोशनहून परतत असताना त्यांची कार ट्रकवर आदळली त्यात त्यांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये जालंधरजवळ शाहकोटला हा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मुलगा, आणि सिनेमाची हिरॉईनही जखमी झाले आहेत. जसपाल भट्टींनी आपल्या विनोदानं एक काळ गाजवला. फ्लॉप शो, उलटा-पुलटा या त्यांच्या सीरीयल्स प्रचंड गाजल्या. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आपल्या विनोदी शैलीतून चिमटे काढले. टीव्ही गाजवणार्‍या जसपाल भट्टींनी, जवळपास 30 पेक्षा जास्त पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्यात.विनोदाच्या बादशाहाचं हे अचानक जाणं अनेकांना चटका लावून गेलंय.

close