बंधार्‍यात गैरव्यवहार प्रकरणी 26 अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल

October 23, 2012 12:22 PM0 commentsViews: 13

23 ऑक्टोबर

मराठवाडयातील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधार्‍यांच्या बांधकामामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरुन काही वरीष्ठ अधिकार्‍यांसह 26 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव,अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांसह अन्य 26 अधिकार्‍यांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातील कार्यकारी अधिका-यांपासून ते कनिष्ठ अभियंत्याचा यात समावेश आहे.

गुन्हे दाखल करण्यात आलेले अधिकारी

राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव श्री. नाथ आणि श्री. जाधव यांच्यासह, एम के कुलकर्णी, डी.पी. शिर्के, व्ही.व्ही. गायकवाड, आर.डी. कोंगनोळीकर, पी.सी. झपके, डी.आर. कंदी, बी.एन.कंदरफळे, जी.एस. लोखंडे, ए.ए.कपोले, आर.बी. घोटे, ए.डी. कोकाटे, ए.आर. कांबळे, एस.आर.सुर्यवंशीडी.एन.जनरोडे, ए.बी.जोगदंड, ए.पी. कोहीरकर, एन.एल. सावळे, ओ.जी. मुदिराज, आर.के निटुरकर, एस.बी.चाटे, लक्ष्मणराव पाटील आणि राजेंद्र काळे

close