कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला

October 23, 2012 12:41 PM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवागी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याचा दयेचा अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने फेटाळला आहे. कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस गृहमंत्रालयानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली होती. आता राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर सही केली की कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

फाशीच्या शिक्षेला आव्हान देणारी कसाबची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर कसाबनं 18 सप्टेंबरला फाशीची शिक्षा टाळण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे. आर्थर रोड जेलच्या अधीक्षकांनी कसाबचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. कसाबवर खून, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणे हे गुन्हे कसाबविरुद्ध सिद्ध झाले आहेत. 'कसाबचा पहिला आणि महत्त्वाचा गुन्हा म्हणजे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे. ज्या प्रमाणात प्राणहानी झाली, संपत्तीचं नुकसान झालं आणि दहशत पसरली, त्यावरून हा खटला दुर्मिळातला दुर्मिळच आहे. किंबहुना या प्रजासत्ताकाच्या जन्मापासून या सर्वोच्च न्यायालयाने असा खटला पाहिला नव्हता. त्यामुळे कसाबला फाशी देण्यावाचून आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही.' असं कोर्टानं आपल्या निर्णयात स्पष्ट केलंय. आता एकदा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर कसाबला फासावरच लटकवले जाणार हे निश्चित.

close