राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी ?

October 27, 2012 9:54 AM0 commentsViews: 3

27 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे जोरदार वाहत आहे. दोन दिवसात चार मंत्र्यांनी राजीनामे देऊन बढतीसाठी सज्ज झाले आहे. तर 2014 निवडणुकांसाठी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना पक्षाच्या कार्यकरी अध्यक्षपदी बसवण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या अतिरिक्त जबाबदार्‍याही सोपावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णांपाठोपाठ आज आणखी तीन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिलेत. समाजकल्याण मंत्री मुकुल वासनिक, माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी तसंच पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे. या तिघांवरही पक्षकार्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही तरूण राज्यमंत्र्यांना बढती मिळणार आहे. उद्या सकाळी साडे अकरा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल.

कोणत्या मंत्र्यांनी राजिनामे दिलेत ?

मुकुल वासनिक, समाजकल्याण मंत्रीअंबिका सोनी, माहिती आणि प्रसारण मंत्रीसुबोधकांत सहाय, पर्यटनएस.एम.कृष्णा, परराष्ट्र

कोणाला बढती मिळू शकते

सी.पी.जोशींना रेल्वे मंत्रालय दिलं जाऊ शकतं. सी पी जोशींकडे सध्या रस्ते आणि दळणवळण मंत्रालयाची जबाबदारी होती. तर क्रीडा राज्य मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार होता ज्या अजय माकन यांच्याकडे होता, त्यांना आता कॅबिनेटपदी बढती मिळू शकते. सचिन पायलट, सध्या माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, मिलिंद देवरा, सध्या माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, ज्योतिरादित्य शिंदे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री या तिघांनाही कॅबिनेटपदी बढती मिळू शकते. lj नागरी विकास मंत्री कमलनाथ यांच्याकडे संसदीय कार्यमंत्रीपदाचा अतिरिक्त भारही दिला जाण्याची शक्यता आहे.

close