राष्ट्रपती राजवटीची शिवसेनेची मागणी

December 2, 2008 5:29 AM0 commentsViews: 4

2 डिसेंबर, मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात अस्थिर वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. यासंदर्भांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली. दरम्यान,आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री विलासराव देशमुख राजभवनात दाखल झाले आहेत तर राज्यपाल एस. सी. जमीर दिल्लीला रवाना झाले आहे.

close