‘संसद विसर्जित करा, नव्याने निवडणुका घ्या’

October 29, 2012 2:37 PM0 commentsViews: 3

29 ऑक्टोबर

केंद्रातलं यूपीए सरकार लोकांच्या विरोधी धोरणं राबवतंय. त्यामुळे या सरकारनं संसद विसर्जित करावी. लोकांना नवं सरकार निवडू द्यावं अशी मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केली. सरकार भांडवलदारांच्या इशार्‍यावर चालतंय असाही आरोप व्ही के सिंग यानी केलाय. या सगळ्या मागण्यांना आणि आरोपांना अण्णा हजारे यांनी आपला पाठिंबा दिला आहे. व्ही.के. सिंग आणि अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.

काळ्या पैशाच्या मुद्यावर सरकार गप्प का ? सरकार अल्पमतात असताना कोणतेही निर्णय कसे घेऊ शकते ? सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. खासगी कंपन्यांच्या हितासाठी सरकार कायद्याची पायमल्ली करत आहे. देश कसा चालवायचा याचा निर्णय लोकांवर सोपवला पाहिजे यासाठी संसद विसर्जित करून नव्याने निवडणुका घ्याव्यात अशी मागणी व्ही के सिंग यांनी केली. ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं पण स्वातंत्र्यानंतर आपण आणखी 65 वर्ष पारतंत्र्यात गेलो आहे. लोकांनी आताच जागं झालं पाहिजे नाहीतर पुढील भविष्यात वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे असंही सिंग म्हणाले. अण्णा हजारे यांनी सिंग यांच्या सर्व आरोपांना पाठिंबा दिला आहे. लोकांनी आता जागं व्हावं असं आवाहनही अण्णांनी केलं.

close