हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्यातल्या आमदारांचीच अनास्था

October 27, 2012 10:09 AM0 commentsViews: 34

27 ऑक्टोबर

मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्नावर आज शनिवारी औरंगाबादमध्ये बोलवलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीला अर्ध्याहून अधिक आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींची अनास्था समोर आली आहे. मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवण्याच्या मागणीसाठी सर्वच पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मराठवाड्यातील फक्त 11 च आमदार हजर होते. गेल्या महिनाभरापासून नगर आणि नाशिक जिल्हयातून पाणी दयावं ही मागणी केली जात होती. त्या मागणीवरुन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. पण त्यातलं एक टीएमसी पाणी मराठवाडयाच्या वाटयाला आलं. मराठवाड्यामध्ये सध्या सर्वच धरणं, कालवे कोरडे आहेत. त्यामुळं आणखी पाणी मिळवण्यासाठी सर्वच आमदारचा एक दबावगट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हयातील गंगापुरचे आमदार प्रशांत बंब यांनी यासाठी पुढकार घेतला.

close