मुंबई पालिकेकडून कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

October 23, 2012 4:09 PM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर

दसर्‍याच्या पूर्वसंध्येला मुंबई महापालिका कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांना 12 हजार 100 रुपये इतका बोनस मंजूर करण्यात आल्यामुळे 1 लाख 30 हजार कर्मचार्‍यांना हा बोनस मिळणार आहे. त्याचबरोबर हंगामी असलेल्या अनुदानित शाळेतील शिक्षक दत्तक वस्तीतल्या कर्मचार्‍यांनाही बोनस दिला जाणार आहे. त्यांच्या पगाराच्या 10 टक्के बोनस मिळणार आहे. यामुळे 140 कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. मागिल वर्षी बोनसवरुन कर्मचारी आणि पालिकेमध्ये वाद झाला होता त्यामुळे कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. मात्र वर्षी मात्र पालिकेनं पुनरावृत्ती टाळली आहे.

close