पेट्रोल 30 पैसे, डिझेल 18 पैशांनी महागणार

October 25, 2012 1:33 PM0 commentsViews: 7

25 ऑक्टोबर

डिझेलमध्ये झालेली दरवाढ आणि घरघुती गॅस सिलिंडरमध्ये मर्यादा यामुळे सर्व सामान्यचं पुरतं कंबरडं मोडलं असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्राने आणखी एक 'जोर झटका धीरे से' दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किरकोळ दरवाढ होणार आहे. पेट्रोलचे दर 30 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी वाढणार आहे. ही दरवाढ किरकोळ जरी असली तरी त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे. अलीकडेच पेट्रोल पंप डिलर्सनी 8 तास पंप चालू ठेवण्याचे हत्यार उपसले होते. यावर तोडगा म्हणून कमीशनमध्ये वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

close