कोल्हापूरमध्ये ‘स्वाभिमानी’ची 11 वी ऊस परिषद

October 27, 2012 10:22 AM0 commentsViews: 68

27 ऑक्टोबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 11 वी ऊस परिषद आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर इथं होत आहे. आजच्या ऊस परिषदेतून खासदार राजू शेट्टी कोणती मागणी करणार याकडं सगळ्या ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांचं लक्ष लागंलंय. काही दिवसांपूर्वीच खासदार शेट्टी यांनी यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाला 3 हजार दर द्यावा अशी मागणी केली आहे. तसंच गेल्या वर्षीच्या बिलामधील अंतिम बिल देण्यात यावं यावरही स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे त्यामुळं आज राजू शेट्टींच्या भाषणाकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या ऊस परिषदेला सीमाभागासह सातारा, सांगली, सोलापूर अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या ऊस परिषदेतून राजू शेट्टी यांच्या यापुढच्या आंदोलनाचीही दिशा स्पष्ट होणार असून त्यांच्या मागण्यांकडं आता साखर कारखानदारांसह सरकारचंही लक्ष असणार आहे. या परिषदेला सुमारे 1 लाख शेतकरी उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

close