संघाने वापरला संशयास्पद पैसा -माणिकराव ठाकरे

October 25, 2012 2:00 PM0 commentsViews: 14

25 ऑक्टोबरकाँग्रेसनं आता भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या लढाईत थेट संघाला खेचलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेसने आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. संघाच्या कार्यालयाच्या बांधकामासाठी जो पैसा वापरण्यात आलाय, तोच मुळात संशयास्पद आहे असा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. विशेष म्हणजे युतीच्या सत्तेच्या काळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना हे बांधकाम करण्यात आलंय. त्यांच्यावर झालेले आरोप अत्यंत स्पष्ट आहे आजपर्यंत आम्ही असं समजत होतो संघ हा जातीवादी पक्ष आहे. एक जातीवादी संघटना आहे. अशी संघटना आज भ्रष्टाचाराला खत पाणी घालत आहे. त्यामुळं आता संघ कार्यालयाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीय. भाजपने मात्र हे आरोप फेटाळले आहे. अनेक वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाची काँग्रेसला आताच का आठवण झाली, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

close