सिंचनावरुन चुकलं आघाडीचं गणित !

October 29, 2012 4:21 PM0 commentsViews: 3

दीप्ती राऊत, नाशिक

29 ऑक्टोबर

सिंचनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. दोन्ही पक्षाचे नेते सध्या वेगवेगळे दौरे करत आहे. संधी मिळते तिथे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताहेत. आम्ही किती यशस्वी सिंचन केलं हे राष्ट्रवादीचे नेते सांगतायत तर सिंचनाचं गणित कसं चुकलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

पाणी देताना पिण्यासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी कशासाठी आणि कशापद्धतीनं वापरलं गेलं याचा हिशोब लोकांसमोर येणं आवश्यक आहे अशी भूमिका राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे मांडत आहे तर राधाकृष्ण विखेपाटील म्हणतात, विदर्भात शेतीचं पाणी उद्योगांना वळवण्याचा प्रयत्न दुदैर्वी झाला. त्यातून आपल्याला शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत.

दादा तुमचा पायगुण एवढा चांगला, आज तुम्ही आलात, आपले ज्येष्ठ मंत्री रामराजे निंबाळकर यांचा फोन आला, 40 कोटीची वर्क ऑर्डर काढली आहे, पुढल्या आठवड्यात नारळ फोडायचा असं मधुकरराव पिचड म्हणले.

तर लोकांना गोड स्वप्न दाखवलं, नारळ फोडला, भूमीपूजन केलं.पाणी येईल लोक विचारतात. पाणी कधी मिळेल सिंचनाबद्दल बोलायचं झालं तर आपलं गणित बिघडलंय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

गणित फक्त सिंचनाचंच बिघडलं नाहीए, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधलंही गणित बिघडलंय. सत्तेत वाटेकरी असलेल्या दोन पक्षांमध्येही धुमसतोय. सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या निमित्तानं हिवाळी अधिवेशनातले सूर काय असणार याचीच ही रंगीत तालीम…

close