भारतीय वंशाचे उद्योजक रजत गुप्तांना अमेरिकेत तुरुंगवास

October 25, 2012 5:00 PM0 commentsViews: 21

25 ऑक्टोबर

गोल्डमन सॅच या जगप्रसिद्ध इन्वेस्टमेंट फर्मचे माजी संचालक आणि भारतीय वंशाचे रजत गुप्ता यांना अमेरिकेच्या कोर्टाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गुप्ता यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही शिक्षा झालीय. त्यांनी कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीतली महत्त्वाची माहिती श्रीलंकेच्या एका फंड मॅनेजरला पुरवली आणि यातून कोट्यवधी डॉलर्स मिळवले. दरम्यान, रजत गुप्ता यांनी अनेक लोककल्याणकारी कामं करतात. त्यांच्या चांगल्या कामाची दखल कोर्टाने घेतली. पण जगात वाईट कामं करणारी अनेक चांगली माणसं आहेत असं म्हणत कोर्टाने गुप्ता यांना 2 वर्ष तुरुंगवास ठोठावला. 1948 मध्ये कोलकात्यात त्यांचा जन्म झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी वडील तर 18व्या वर्षी आईला पोरके झालेले रजत यांनी दिल्ली आयआयटी आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 45व्या वर्षी मॅककिनसे या त्याकाळच्या अत्यंत प्रभावी कन्सल्टिंग फर्मचे ते प्रमुख बनले आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीला खर्‍या अर्थानं उभारी मिळाली. पुढे इंडियन बिझनेस स्कूलचे ते सह-संस्थापक झाले. अशी देदिप्यमान कारकिर्द असणारे गुप्ता यांना आज भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात जावं लागलंय.

कोर्टानं निकाल सुनावल्यानंतर गुप्ता यांनी काय म्हटलं ?या प्रकरणाचा माझं कुटुंब, माझे मित्र आणि माझ्या संस्थेवर जो परिणाम होणार आहे, त्यामुळे मला अतिव दु:ख होतोय. आयुष्यभर झटून मी जे यश मिळवलं ते एका झटक्यात गमावलंय.

close