मातेची दोन चिमुकल्यांसह रेल्वेखाली आत्महत्या

October 27, 2012 11:18 AM0 commentsViews: 11

27 ऑक्टोबर

विरारमध्ये एका महिलेने आपल्या दोन मुलांसोबत लोकलखाली आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घडना घडली आहे. सारिका ज्ञानेश्वर भोसले असं या महिलेचं नाव आहे. शुक्रवारी रात्री आपल्या 7 वर्षाच्या ऐश्वर्या आणि 4 वर्षाच्या आदिती यांना घेऊन सारिका भोसले यांनी आत्महत्या केली. सारिका दोन महिन्यांपूर्वीच विरारमधील मनवेलपाडा भागातील जय जीवदानी कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहायला आली होती. सारिकाचा पती ज्ञानेश्वर हा विरारमधील एका बिल्डरकडे नोकरी करतो. शुक्रवारी सारिका साडेसहा वाजता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन विरार स्टेशनला आली. आणि काही वेळातच तिने समोरून येणार्‍या ट्रेनसमोर दोन्ही मुलींना घेऊन उडी मारली. त्यात या तिघींचाही मृत्यू झाला. या आत्महत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट झालं नसून विरार पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

close