उद्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल;तरूण चेहर्‍यांना संधी

October 27, 2012 3:26 PM0 commentsViews: 11

27 ऑक्टोबर

उद्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असून आज दिल्लीत घडामोडी वेग आलाय. सर्वात अगोदर परराष्ट्रमंत्री एस एम कृष्णांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ दोन दिवसात आणखी सात कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले. समाजकल्याण मंत्री मुकुल वासनिक, माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी तसंच पर्यटन मंत्री सुबोधकांत सहाय यांनीसुद्‌धा राजीनामा दिला आहे. या तिघांवरही पक्षकार्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी काही तरूण राज्यमंत्र्यांना बढती मिळणार आहे.तसेच ग्रामीण विकास राज्यमंत्री अगाथा संगमा, दळणवळण राज्यमंत्री महादेव सिंग खंडेला, जलस्रोत राज्यमंत्री विल्सन पाला यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे दिले आहे. या सर्व सातही मंत्र्यांचे राजीनामे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्विकारले आहे. उद्या सकाळी साडे अकरा वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे 2014 च्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

- सात मंत्र्यांचे राजीनामे

मुकुल वासनिक, समाजकल्याण मंत्रीअंबिका सोनी, माहिती आणि प्रसारण मंत्रीसुबोधकांत सहाय, पर्यटनएस.एम.कृष्णा, परराष्ट्रअगाथा संगमा, ग्रामीण विकास राज्यमंत्रीमहादेव सिंग खंडेला, दळणवळण राज्यमंत्री विल्सन पाला, जलस्रोत राज्यमंत्री

यांना मिळणार बढती ?

शशी थरूर, पर्यटन राज्यमंत्री सचिन पायलट, क्रीडा आणि युवक कल्याण (स्वतंत्र पदभार)ज्योतिरादित्य शिंदे, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री (कॅबिनेट)मनीष तिवारी, राज्यमंत्री कमलनाथसी.पी.जोशी

close