जमीन गैरव्यवहार प्रकरणी वडरांना क्लीन चीट

October 26, 2012 10:33 AM0 commentsViews: 22

26 ऑक्टोबर

जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर रॉबर्ट वडरांना क्लीन चीट मिळाली आहे. वडरा यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोबरला हरयाणा सरकारच्या भुमिलेख विभागाचे तत्कालीन महासंचालक अशोक खेमका यांनी या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरगाव, पनवल, फरिदाबाद आणि मेवत इथल्या उपायुक्तांनी याची चौकशी केली. या चौकशीमध्ये रॉबर्ड वडरा यांनी विकलेल्या आणि खरेदी केलेल्या जमिनीच्या कुठल्याही व्यव्हारामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही.. असा अहवाल या उपायुक्तांनी हरियाणा सरकारला दिला. जमिनीच्या या व्यवहारांमधून सरकारला मिळणारं मुद्रांक शुल्क बुडालेलं नाही असंही या अहवालात म्हटलं. दरम्यान, हा व्यवहार रद्द करणार्‍या खेमका यांनी या चौकशीची आपल्याला माहितीच नव्हती आणि अशाप्रकारे चौकशी करणं बेकायदेशी असल्याचं म्हंटलं आहे.

बेकायदेशीर चौकशी – केजरीवाल

रॉबर्ट वडरांवरील आरोपांबाबत झालेली चौकशी बेकायदेशीर असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसंच गडकरींच्या चौकशीचाही देखावा केला जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय.

close