केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल;22 मंत्र्यांनी घेतली शपथ

October 28, 2012 9:32 AM0 commentsViews: 15

28 ऑक्टोबरकेंद्रीयमंत्रिमंडळाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत फेरबदल आज रविवारी करण्यात आला. मात्र महाराष्ट्राला डावलून, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगाल यांना झुकते माप देत मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला आहे. या नव्या मंत्रिमंडळात सात केंद्रीय मंत्री आणि 15 राज्यमंत्री समावेश आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नव्या मंत्र्यांची पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या नव्या मंत्रिमंडळात अजय माकन, अश्विनीकुमार,चंदेश कुमारी,दिनशा पटेल,हरिश रावत, के रहमान, पल्लम राजू यांचा समावेश आहे. तर मनीष तिवारी आणि दक्षिणी अभिनेते खासदार चिरंजिवी यांना राज्यमंत्रीपद(स्वतंत्र्य प्रभार) देण्यात आलंय. यासोबत 13 राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. यामध्ये लालचंद कटारिया.कृपारानी किल्ली, बलराम नाईक, दीपादास मुंशी, एस सत्यनारायण,शशी थरूर, तारीक अन्वर, के सुरेश, के जयसुर्याप्रकाश यांचा समावेश आहे.नवीन केंद्रीय मंत्रीके रहमान खानदिनशा पटेलअजय माकनपल्लम राजूअश्विनीकुमारहरिश रावतचंदेश कुमारी कटोचनवीन राज्यमंत्री (स्वतंत्र्य प्रभार)मनीष तिवारी – माहिती आणि जनसंपर्क मंत्रीचिरंजीवी – पर्यटन मंत्रीयांनी घेतलीराज्यमंत्रीपदाची शपथशशी थरूर, के सुरेश, तारीक अन्वर, के जे सुर्यप्रकाश रेड्डी, राणी नारा, अधीर रंजन चौधरी, ए एच खान चौधरी, एस सत्यनारायण, विनॉन्ग एरींग, दीपा दासमुंशी, पी बी नाईक, कृपाराणी किल्ली, लालचंद कटारियाया केंद्रीय मंत्र्यांना मिळाली बढतीवीरप्पा मोईली – पेट्रोलियम मंत्रीसलमामन खुर्शीद – परराष्ट्र मंत्रीजयराम रमेश -ग्रामीण विकासएस जयपाल रेड्डी – विज्ञान,तंत्रज्ञान आणि भूविकास मंत्रीकमलनाथ -शहरविकास आणि संसदीय कारभारवायलर रवी – अप्रवासी भारतीय खातंकपिल सिब्बल – दूरसंचार मंत्रीसीपी जोशी राज्य महामार्ग मंत्रीकुमारी शैलजा – सामाजिक न्याय विभागपवन कुमार बन्सल – रेल्वे मंत्री

close