ऐन दिवाळीच्या तोंडावर सरकारकडून कापूस खरेदी नाही

October 31, 2012 10:13 AM0 commentsViews: 19

31 ऑक्टोबर

दिवाळी तोंडावर आली असताना विदर्भात नगदी पीक असलेल्या कापसाची खरेदी सरकारनं अद्याप सुरू केली नाही. त्यामुळं शेतकर्‍यांना खासगी व्यापार्‍यांना कापूस विकावा लागतो. सरकारनं कापूस खरेदी सुरू न केल्यानं व्यापारी शेतकर्‍यांना कमी भाव देतात. त्यामुळं सरकारनं कापसाला 5 हजार भाव द्यावा आणि तातडीनं खरेदी सुरू करावी अशी मागणी शतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, यावर्षी नाफेड मार्फेत कापूस खरेदी करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी पतपुरवढादार मिळत नाही. सरकारनं त्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातही दिलीय. या प्रक्रियेमुळं कापूस खरेदीसाठी विलंब होणार हे आता स्पष्ट झालंय.

close