गडकरींचे ड्रायव्हर 26 कंपन्यांच्या संचालकपदी

October 26, 2012 5:35 PM0 commentsViews: 5

26 ऑक्टोबर

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अडचणी वाढत चालल्या आहे.गडकरींचे 4 निकटवर्तीय 26 कंपन्यांच्या संचालकपदांवर आहेत. यामध्ये त्यांचे ड्रायव्हर आणि अकाउंटंटचाही समावेश आहे असं समोर आलं आहे. पूर्ती प्रकरणात आयबीएन-नेटवर्कच्या हाती आणखी कागदपत्र लागली आहे. यातही धक्कादायक माहिती पुढे आली.

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहे. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार बेनामी कंपन्यांनी गडकरींच्या फक्त पूर्ती शुगर अँड पॉवर या एकाच कंपनीत गुंतवणूक केलेली नाही. आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार गडकरींचा ड्रायव्हर, अकाउंटंट आणि त्यांचा एक कर्मचारी हे तिघं तीन कंपन्यांचे मालक आहेत. या कंपन्या आहेत. बुलडाणा शुगर अँड पॉवर, भंडारा शुगर अँड पॉवर आणि अकोला शुगर अँड पॉवर.आश्चर्य म्हणजे या तिन्ही कंपन्या 3 मार्च 2010 या एकाच दिवशी स्थापन झाल्या. भंडारा, बुलडाणा आणि अकोला या 3 जिल्ह्यांमध्ये साखर आणि वीजेच्या उत्पादनासाठी या कंपन्या स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पण या कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत कुठलंही उत्पादन घेतलं नाही आणि कसलाच व्यवहारही केला नाही, असं त्यांच्या बॅलेन्सशीटवरून स्पष्ट होतं. यातल्या भंडारा आणि अकोला शुगर अँड पॉवर या कंपन्यांचा पत्ता एकच होता. या पत्त्यावर जेव्हा आयबीएन नेटवर्कची टीम पोचली, तेव्हा तिथे या कंपन्या नव्हत्या.कंपन्यांचं गौडबंगाल- नितीन गडकरींच्या निकटवतीर्ंच्या असलेल्या या कंपन्या कशासाठी स्थापन करण्यात आल्या ?- कंपन्या स्थापन झाल्यावर 2 वर्षं लोटून गेले तरी या कंपन्या कागदावरच आहेत- पूर्तीमध्ये ज्या पद्धतीनं पैसा गुंतवण्यात आला, तशाच पद्धतीनं पैसा गुंतवण्यासाठी या कंपन्या स्थापन करण्यात आल्या का ?गडकरी आणि त्यांच्या निकटवर्तियांसाठी या प्रश्नांची उत्तरं अडचणीची ठरू शकतात.

close