अमेरिकेला सँडी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

October 29, 2012 5:43 PM0 commentsViews: 20

29 ऑक्टोबर

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला सँडी चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. अमेरिकेच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ ठरण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ वेगानं न्यू जर्सीकडे जातंय. खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिकेतल्या काही राज्यांतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येतंय. न्यू यॉर्क, वॉशिंग्टन आणि फिलाडेल्फिया राज्यातली सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधली सबवे वाहतूक आणि बस सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प करण्यात आलीय. विमानांची 3000 हजार उड्डाणंही रद्द केली. न्यूयॉर्क शेअर बाजारातले व्यवहारही बंद करण्यात आलेत. या सॅन्डी चक्रीवादळानं आतापर्यंत 67 जणांचा बळी घेतला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारावरही या वादळाचा परिणाम झाला आहे.

close