रेल्वे प्रवास महागणार;रेल्वेमंत्र्यांनी दिले संकेत

October 29, 2012 9:41 AM0 commentsViews: 7

29 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता रेल्वे प्रवास महागणार असल्याचे संकेत मिळत आहे. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात येत्या काही काळात वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत रेल्वेमंत्री पवनकुमार बंसल यांनी दिलेत. बंसल यांनी आज रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रेल्वेची परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलणार असल्याचं सांगितलंय. तसंच प्रवासी भाड्यात वाढ केली तरी ती माफक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. वाढलेल्या उत्पन्नातून प्रवाशांच्या सोयी सुविधांवर खर्च केला जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

close