सेट टॉप बॉक्स बसवण्याचा आज शेवटचा दिवस

October 31, 2012 10:19 AM0 commentsViews: 5

31 ऑक्टोबर

केंद्र सरकारनं डीजीटायजेशन अनिवार्य केल्यानंतर आपल्या घरात टीव्हीसाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज जर सेट टॉप बॉक्स बसवले नाही तर अनेकांच्या टीव्हीवरील चित्र गायब होणार आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये आजपासून डीजीटायजेशन अनिवार्य आहे. त्यामुळे उद्यापासून सेट टॉप बॉक्स नसलेल्या मुंबईकरांना टीव्ही पहाता येणार नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी सेट टॉप बॉक्स केबलचालकांकडून ग्राहकांनी घेतले असले तरी ते बसवले नसल्यानं त्यांचे टीव्ही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील ग्राहकांना आज सेट टॉप बॉक्स बसवण्याची अखेरची संधी आहे.

close