नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम ?

October 26, 2012 10:55 AM0 commentsViews: 6

26 ऑक्टोबर

केजरीवाल आणि टीमने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले. मात्र संघ परिवार आणि भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे गडकरींना दिलासा मिळाला मिळाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरींना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतला आहे. नागपूरच्या संघमुख्यालयात झालेल्या संघाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गडकरींना जाणूनबुजून टार्गेट केलं जातंय. त्यामुळे संघ त्यांच्या पाठीशी उभा राहील असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच गडकरीच दुसर्‍यांदा पक्षाचे अध्यक्ष होतील अशीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

close