गैरव्यवहार प्रकरणी सुरेश जैन यांच्यावर गुन्हा दाखल

October 30, 2012 9:56 AM0 commentsViews: 6

30 ऑक्टोबर

जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणी जामीन फेटाळला गेल्यानंतर आमदार सुरेश जैन आणखी अडचणीत आले आहे. जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांच्यासह त्यांच्या जवळच्या माणसांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जैन यांनी जळगाव विमानतळाच्या कामात पाच कोटींचा अपहार केल्याचा आरोप नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीची दखल घेत हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे जैन यांच्यासह स्थानिक नगरसेवक, अधिकारीही अडचणीत आलेत. जैन यांनी सहकारी बँकेत सत्ता असताना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

सुरेश जैन यांनी ज्या संस्थांना बेकायदा कर्जवाटप केल्याचा आरोप आहे त्या संस्था या त्यांच्याच जवळच्या लोकांच्या आहेत. यामध्ये

- खानदेश बिल्डर्स – 253 कोटी 80 लाख 75 हजार- कृषी धन कॅटल फीड – 177 कोटी 15 लाख- इटीपी हाऊसिंग – 34 कोटी 75 लाख- जैन इरिगेशन – 11 कोटी 90 लाख

close