औरंगाबाद पालिकेवर युतीचा झेंडा; कला ओझा नव्या महापौर

October 29, 2012 10:01 AM0 commentsViews: 3

29 ऑक्टोबर

औरंगाबाद महापालिकेवर युतीची झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे. शिवसेनेकडे महापौरपद गेलंय तर भाजपला उपमहापौरपद मिळालं आहे. रंगतदार झालेल्या लढतीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला.ऐनवेळी उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजू शिंदेंचा पराभव झाला आहे. युतीच्या कला ओझा नव्या महापौर झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या फिरदोस फातिमा यांचा पराभव केला. ओझा यांना 58 तर फिरदोस फातिमा यांना 40 मतं मिळाली. उपमहापौर पदी भाजपचे संजय जोशी विजयी झाले आहे. त्यांना 56 मतं मिळाली. तर विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू शिंदे यांना 43 मतं मिळली.

close