सवलतीच्या दरात सिलिंडरच्या मागणीसाठी मोर्चा

October 31, 2012 12:58 PM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर

स्वयंसेवी संस्थांना सवलतीच्या दरातच एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत यासाठी पंढपुरात काल मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. विविध स्वयंसेवी संस्थांनी हा मोर्चा काढला. या मोर्च्यात शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी मोठा संख्येनं सहभागी झाले होते. सवलतीच्या दरात वर्षाला फक्त 6 च सिलिंडर मिळणार असल्यानं सामाजिक संस्थांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. या संस्थांवरचा आर्थिक बोजा वाढणार असल्यानं ही आता पैशाचा मेळ घालायचा कसा असा प्रश्न या संस्थांसमोर निर्माण झाला आहे.

close