राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे

October 30, 2012 10:03 AM0 commentsViews: 11

30 ऑक्टोबर

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहत आहे. राज्यात मंत्रिपदासाठी आता दिल्लीत लॉबिंग सुरु झालंय. राज्यातल्या आमदारांनी दिल्लीत नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहे. तर काही मंत्री आणि आमदारांनी काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधींचीही वेळ मागितली आहे. सध्या मंत्री संजय देवतळे, दिलीप सानंदा, दिनानाथ पाडोळे, गोपाळ अगरवाल आणि इतर काही काँग्रेस आमदार आज दिल्लीत दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला एक पदभार मिळाला. दुसरीकडे आता मुंबई काँग्रेसअध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईतील अनेक नेत्यांनी आपल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केलीय.

close