जन्मदात्यानंच पाजलं पाच दिवसांच्या मुलीला विष

October 30, 2012 10:13 AM0 commentsViews: 2

30 ऑक्टोबर

माणुसकीला काळीमा फासणारी घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून पित्यानेच आपल्या पाच दिवसांच्या मुलीला बायको आणि आईच्या मदतीने ठार मारल्याची घटना रत्नागिरीत घडलीय. याप्रकरणात श्रीरंग बिराजदार , पत्नी संपदा आणि आई लिलावती या तिघांनाही पोलिसांनी अटक केलं असून या सर्वांना न्यायालयाने तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बिराजदार हा मुळचा कर्नाटक मधला असून रत्नागिरीतल्या स्टॅन्डर्ड अपार्टमेंट मध्ये हे कुटूंब रहात होतं. सुरुवातीपासूनच आपल्याला दुसरी मुलगी नको म्हणून आग्रही असणार्‍या बिराजदार याने आधी आपल्या मुलीला फिनेल पाजलं आणि नंतर आई आणि त्याच्या पत्नीने या चिमुरडीला नाक तोंड दाबून ठार केलं असल्याची कबुली या तिघांनीही पोलिसांना दिलीय. मृत्यू झाल्यानंतर बिराजदारने या चिमुरडीला फ्लॅटच्याच मागच्या बाजूला एका खड्‌ड्यात पुरलं आणी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना याची खबर मिळताच तातडीने घटनास्स्थळी जाऊन या सगळ्याचा छडा लावला.

close