दिवाळीत दिवाळं, 9 सिलिंडर मिळणार नाही

October 31, 2012 5:11 PM0 commentsViews: 10

31 ऑक्टोबर

काँग्रेसशासित प्रदेश 9 सिलिंडर मिळणार या आशेला लागलेल्या जनतेच्या पदरी पुन्हा एकदा निराश पडली आहे. राज्यातील जनतेला गॅस सिलिंडरच्या सबसिडीबाबत दिलासा मिळालेला नाहीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत गुड न्यूज मिळेल अशी सगळ्यांना अपेक्षा होती. या प्रस्तावावर आज निर्णय झालेला नाही. काँग्रेसशासित राज्य सरकारांना गॅस सिलेंडरची मर्यादा 6 वरून 9 इतकी करण्याची सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली होती. पण 3 सिलिंडर्सची सवलत सर्व ग्राहकांना द्यायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर 2400 कोटींचा बोजा पडणार आहे, असं राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थखात्यानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितलं आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांना किंवा पिवळ्या कार्डधारक ग्राहकांना सवलतीचे 3 सिलेंडर द्यावे, अशा प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकतं असं वाटत होतं पण तो होऊ शकलेला नाही. असाच निर्णय दिल्ली आणि आंध्रप्रदेश सरकारनं घेतला आहे.

close